पाणीदार मराठवाड्याचे स्वप्न अखेर भंगले! ११६ योजना रद्द करण्याचा निर्णय
संभाजीनगर : प्रतिनिधी दुष्काळग्रस्त मराठवाड्याला पाणीदार बनविण्यासाठी शासनाने मंजूर केलेल्या ११६ योजना रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. दुष्काळाचा शाप भोगणा-या मराठवाड्यातील जलसंधारणासाठी मंजूर केलेल्या ११६ प्रकल्पांना राज्य शासनाने रद्द करण्याचा धक्कादायक निर्णय घेतला आहे. या योजनांसाठी मंजूर असलेला ३१५ कोटी ५ लाख रुपयांचा खर्च वाचवण्यात आल्याचे सांगितले जात असले तरी, या निर्णयामुळे मराठवाड्यातील पाणीटंचाईच्या…