RAW च्या अधिका-यांचे संभाजीनगर, बीड, परभणीवर विशेष लक्ष; केंद्राकडून सुरक्षेचा आढावा
नवी दिल्ली : प्रतिनिधी पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या तपासात काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या स्लीपर सेलची महत्त्वाची भूमिका समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने अंतर्गत सुरक्षेचा आढावा घेणे सुरू केले आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सुरू झालेल्या या मोहिमेत महाराष्ट्रातील संशयित स्लीपर सेलच्या हालचालींचा आढावा वरिष्ठ पातळीवरून घेण्यात येत आहे. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणीतील व्यक्तींना यापूर्वी दहशतवादी कारवायांच्या…