Fight for Bread | भाकरीवरून उत्तर विरुद्ध दक्षिण वादाचा भडका! कलबुर्गी विद्यापीठात हाणामारी
कलबुर्गी : News Network एकीकडे तामिळनाडूमध्ये हिंदी भाषेवरून राजकारण तापले असताना कर्नाटकमध्ये उत्तर आणि दक्षिणेतील विद्यार्थ्यांमध्ये भाकरीवरून वाद होऊन प्रकरण हाणामारीपर्यंत पोहोचल्याची घटना घडली. कलबुर्गी येथील कर्नाटक केंद्रीय विद्यापीठात भाकरीवरून विद्यार्थ्यांच्या दोन गटांमध्ये हा वाद झाला. कर्नाटक केंद्रीय विद्यापीठ, कलबुर्गी जिल्ह्यामधील आळंद तालुक्यात कडगंची गावामध्ये आहे. तिथे विद्यापीठाच्या आवारात असलेल्या कॅन्टिनमध्ये भाकरीवरून झालेल्या वादाचे पर्यावसान…