Black Coats | वकिलांना कोटपासून येत्या ३० जूनपर्यंत सूट
पुणे : प्रतिनिधी वकील आणि काळा कोट हे समीकरण ठरलेले आहे. मात्र, उन्हाचा चटका वाढल्यानंतर पारंपरिक पोशाखात न्यायालयीन कामकाज करणे वकील वर्गाला जवळपास अशक्य होते. काळा रंग सूर्यप्रकाश शोषून घेत असल्यामुळे उन्हाळ्यात काळ्या रंगाचे कपडे वापरणे शक्यतो टाळले जाते. त्या अनुषंगाने सिव्हिल मॅन्युअलच्या प्रकरण २२ मधील परिच्छेद ६३६ नुसार वकिलांना कोट वापरास सूट देण्यात आली…