Hindenberg | अखेर हिंडेनबर्गचाच बाजार उठला; अदानीच्या शेअर्समध्ये ९ टक्के वाढ
वॉशिंग्टन : वृत्तसंस्था जगभरातील काही अब्जाधीशांचा बाजार उठवायला निघालेल्या अमेरिकन शॉर्ट सेलिंग फर्म हिंडेनबर्गने स्वत:चाच गाशा गुंडाळला आहे. २०१७ ते २०२४ या कालावधीत या कंपनीने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या अहवालांनी खळबळ उडवून दिली होती. या काळात गौतम अदानी, जॅक डोर्सी आणि कार्ल इकान यांसारख्या जगातील आघाडीच्या अब्जाधीश उद्योगपतींचे सर्वाधिक नुकसान झाले. जानेवारी २०२३ मध्ये अदानी समुहाच्या…