रिलायन्स पॉवरला अच्छे दिन; सलग दोन दिवस अप्पर सर्किट
मुंबई : प्रतिनिधी उद्योगपती अनिल अंबानी यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दिल्ली हायकोर्टाने सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने रिलायन्स पॉवरवर घातलेल्या बंदीला आणि जाहीर नोटीसला स्थगिती दिली आहे. यानंतर रिलायन्स पॉवरच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाली. नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला रिलायन्स पॉवरने जाहीर केले होते की, त्यांना सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने एक नोटीस पाठवली…