‘… चांगभलं’च्या गजराने ज्योतिबा डोंगर दुमदुमला!
कोल्हापूर : khabarbat News Network ज्योतिबा डोंगर येथील श्री दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाच्या दर्शनासाठी महाराष्ट्र, कर्नाटक राज्यातील भाविक येत आहेत. आज रविवार व चौथी माळ असल्याने गर्दीने डोंगर खचाखच भरला. ‘ज्योतिबाच्या नावानं चांगभलं’च्या जयघोषाने डोंगर दुमदुमला. आज करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन घेऊन परराज्यातील भाविकांच्या झुंडीच्या झुंडी डोंगरावर आल्या. यामध्ये महिला भाविकांची…