औरंगाबादचा संन्यस्त चौथरा !
स्वामी रामानंद तीर्थ 22 जानेवारी 1972 ला कालवश झाले. आता तर ते अक्षरशः काळाच्या उदरात सामावून गेले, असे म्हटले तर वावगे ठरू नये. हैदराबाद मुक्तीसंग्रामाचे प्रणेते, म. गांधी-वल्लभभाई पटेल यांच्या कणखर वैचारिकतेचा वारसा सांभाळत निजामशाहीतून मराठवाडा विभागाला मुक्ती देणारे धुरंधर नेते, आणि स्वातंत्र्यानंतर सत्तेपासून दूर राहून रचनात्मक कामात रमणारे, कोणतेही पाश, मोहमाया न बाळगणारे संन्यासी….