अयोध्येतील श्रीरामाचे डोळे प्राणप्रतिष्ठेनंतरच उघडणार!
अयोध्येत प्रभू श्रीरामचंद्राच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होण्याचा दिवस आता समीप येऊन ठेपला आहे. या मूर्तीचे अनावरण १७ जानेवारी रोजी केले जाणार आहे. तथापि, प्राणप्रतिष्ठा होईपर्यंत श्रीराम मूर्तीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली जाणार आहे. यामागे शास्त्र असल्याचे सांगितले जात आहे. याबाबत अशी आख्यायिका सांगितली जाते की जेव्हा कोणी भक्त दर्शन घेतो त्यावेळी तो देवाच्या डोळ्यात पाहतो. अशावेळी देव…