Dancer सपना चौधरींसह चौघांवर गुन्हा दाखल; डान्स न करता लाखो रुपये उकळले

Dancer सपना चौधरींसह चौघांवर गुन्हा दाखल; डान्स न करता लाखो रुपये उकळले

लखनौ : बहुचर्चित नृत्यांगना सपना चौधरी तसेच अन्य चार आरोपींविरुद्ध फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. कार्यक्रमाच्या तिकिटासाठी लाखो रुपये उकळल्यानंतरही कार्यक्रम न करता पैसे लुबाडल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला आहे. लखनौ न्यायालयाचे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी शंतनू त्यागी यांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ४०६ आणि ४२० अंतर्गत आरोप निश्चित केले. या सुनावणीवेळी सपना चौधरी व…