Election 2024 : रामलल्लाने आगामी निवडणुकीचा मूड सेट केला!
विश्लेषण/श्रीपाद सबनीस पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांकडे लोकसभेची सेमी फायनल म्हणून बघितलं जात होतं. देशाचा मूड काय आहे हे कळायला मदत होईल या अपेक्षेने सर्व पक्ष आणि कार्यकर्ते या निवडणुकांकडे बघत होते. हिंदी पट्ट्यातील तीन राज्यात मोदी लाट कायम असल्याचं पक्कं झालं. या पाच राज्यांपैकी तेलंगणा आणि मिझोराममध्ये भाजपला गमावण्यासारखं काही नव्हतं. झाला तर फायदाच होणार…