नवनीत राणांच्या सभेत राडा…
अमरावती : दर्यापूर विधानसभा मतदार संघातील खल्लार येथे युवा स्वाभिमानचे उमेदवार रमेश बुंदीले यांच्या प्रचारार्थ माजी खासदार नवनीत राणा यांच्या प्रचार सभेचे शनिवारी (दि.१६) आयोजन करण्यात आले. यावेळी सभेत जमलेल्या काही विरोधकांनी अचानक गोंधळ घालायला सुरुवात केली आणि नवनीत राणा यांच्या दिशेने खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे गावात तणाव निर्माण झाला. दरम्यान, गोंधळ थांबत…