धामदरीच्या विद्यार्थ्यानी शाळेत फुलवली परसबाग
नांदेड : नांदेड जिल्ह्यातील धामदरी येथील जिल्हा परिषदेच्या उपक्रमशील शाळेतून अभ्यासक्रमाबरोबर परसबागेतून विद्यार्थ्यांना भाजी लागवड, जैविक खत, बियाणे, औषधी, शेती मशागत, सेंद्रिय शेतीची माहिती दिली जात आहे. या शाळेतील विद्यार्थ्यांनी आवारात परसबाग फुलवली आहे. या परसबागेतील सेंद्रिय भाज्यांचा वापर माध्यान्ह भोजनात होत आहे. विद्यार्थ्यांना सकस, ताज्या भाज्या त्वरित उपलब्ध व्हाव्यात, भाज्या लागवडीविषयी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष ज्ञान…