साडे तीन लाख भाविकांनी घेतले विठुरायाचे दर्शन
पंढरपूर (महेश भंडारकवठेकर) : माघ शुद्ध एकादशीच्या निमित्ताने पंढरपुरात २२७ दिंड्या दाखल झाल्या. साडे तीन लाखाहून अधिक भाविकांनी आज श्री विठ्ठल-रुख्मिणीचे दर्शन घेतले. माघी यात्रेच्या कालावधीत पंढरपूरात येणाऱ्या दिंड्याना मुक्कामासाठी तसेच भजन किर्तनासाठी प्रशासनाकडून मोफत जागा उपलब्ध करुन देण्यात आली. तुमच्या उपयोगाची महत्वाची बातमी वाचा, khabarbat.com