
कर्नाटकच्या गुहेत 2 मुलींसह रशियन महिलेचे वास्तव्य! व्हिसा संपल्याने गोव्यातून गाठले गोकर्ण
गोकर्ण : प्रतिनिधी कर्नाटकच्या उत्तर कन्नड जिल्ह्यातील गोकर्ण येथील रम्य परंतु अत्यंत धोकादायक रामतीर्थ डोंगरावर एका रशियन महिलेने तिच्या दोन लहान मुलींना घेऊन मागील दोन आठवडे एकांतवासात काढले होते. स्थानिक पोलिसांना गस्तीदरम्यान ही महिला आणि तिची मुले एका गुहेत राहत असल्याचे आढळून आले. त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्यांना तातडीने बाहेर काढण्यात आले. या महिलेचे नाव नीना