
Nashik | नाशिक आर्टिलरी सेंटरच्या १५ अधिका-यांवर गुन्हा! सीबीआयची मोठी कारवाई
नाशिक : प्रतिनिधी नाशिक आर्टिलरी सेंटरच्या १५ अधिका-यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने भ्रष्टाचार केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केल्याने नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नोव्हेंबर २०२४ मध्ये आर्टिलरी सेंटरच्या अधिका-यांची आर्थिक गैरव्यवहार झाल्याच्या संशयातून चौकशी केली होती. भ्रष्टाचारासह