Banking-Finance क्षेत्रात मिळणार २.५० लाख नोक-या… छोट्या शहरांत बंपर भरती!
नवी दिल्ली : प्रतिनिधी देशातील बँकिंग आणि वित्तीय सेवा (बीएफएसआय) क्षेत्रात मोठी वाढ होणार असून, २०३० पर्यंत या क्षेत्रात तब्बल २.५० लाख नवीन नोक-या निर्माण होण्याची शक्यता आहे, असे ‘अडेको इंडिया’च्या ताज्या अहवालात म्हटले आहे. या क्षेत्रात पुढील वर्षी (२०२५-२६) साधारण ८.७ टक्के आणि २०३० पर्यंत सुमारे १० टक्क्यांपेक्षा अधिक वाढ अपेक्षित आहे. विशेष…