मुंबई : प्रतिनिधी
रिझर्व्ह बँकेने सर्वसामान्यांना पुन्हा एकदा दिलासा देत EMI चा भार कमी केला आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर (RBI Governer) संजय मल्होत्रा यांनी रेपो दरात ५० बेसिस पॉईट्सची कपात करण्याची घोषणा केली. यानंतर आता Repo Rate ५.५० टक्क्यांवर आला आहे. यापूर्वीही RBI ने सर्वसामान्यांना दिलासा देत रेपो दरात कपात केली होती.

दरम्यान, रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीच्या बैठकीपूर्वी तज्ज्ञांनी रेपो दरात कपातीची शक्यता वर्तवली होती. जागतिक बाजारांमध्ये अनिश्चितता असतानाही भारतीय अर्थव्यवस्था मजबूत आहे. गुंतवणूकदारांसाठीही भारतीय शेअर बाजारात अनेक संधी आहेत, असे संजय मल्होत्रा म्हणाले. (EMI latest news)
५० बेसिस पॉइंट्सनी रेपो रेट कमी करण्याचा आरबीआयचा निर्णय हा एक उत्तम आणि महत्त्वाचा निर्णय आहे. हे रिझर्व्ह बँकेची आर्थिक स्थिरता आणि विकासाच्या पाठपुराव्यावरील विश्वास देखील दर्शवते. रेपो दर ५.५% पर्यंत कमी केल्याने कर्ज देण्याच्या परिसंस्थेवर मोठा परिणाम होईल, ज्यामुळे Home Loan व्याजदर ७.७५% च्या खाली येतील. विद्यमान आणि संभाव्य गृहखरेदीदारांसाठी हा एक महत्त्वाचा निर्णय ठरणार आहे, अशी प्रतिक्रिया नाहर ग्रुपच्या उपाध्यक्षा आणि एनएआरईडीसीओ-महाराष्ट्रच्या वरिष्ठ उपाध्यक्षा मंजू याज्ञिक यांनी दिली.