अयोध्या : विशेष प्रतिनिधी
अयोध्येतील राम मंदिरामध्ये रामललांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना गतवर्षी करण्यात आली होती. त्यानंतर आज ५ जून रोजी अभिजीत मुहुर्त आणि स्थिर लग्नामध्ये राम दरबारासह मंदिर परिसरातील सात इतर मंदिरांची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.

यानिमित्त उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी अयोध्या आणि काशीमधील १०१ आचार्यांनी वैदिक मंत्रांसह धार्मिक अनुष्ठान केले. या राम दरबारचे हे छायाचित्र.