हिसार : News Network
ज्योती मल्होत्राच्या अटकेनंतर सोशल मीडियावर अनेक अफवा पसरत आहेत. पण आता हिसार पोलिसांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्योती मल्होत्राने कोणत्याही पाकिस्तानी अधिका-याशी लग्न केल्याचा किंवा धर्म परिवर्तन केल्याचा कोणताही पुरावा मिळालेला नाही. तिचा कोणत्याही दहशतवादी संघटनेशी थेट संबंध असल्याचा कोणताही पुरावा नाही. मात्र ती निश्चितच पाकिस्तान ऑपरेटिव्ह एजन्सीशी संबंधित लोकांच्या संपर्कात होती. (Jyoti Malhotra update)

पोलिसांनी ज्योतीचे तीन मोबाईल, एक लॅपटॉप आणि काही इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त केली आहेत. तिची चौकशी अजूनही सुरू आहे. हिसार पोलिसांनी ज्योती मल्होत्रा प्रकरणातील अफवांना पूर्णविराम दिला आहे. ज्योती मल्होत्राची कोणतीही डायरी त्यांच्याकडे नाही आणि तिचा कोणत्याही दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचा कोणताही पुरावा मिळालेला नाही. (jyoti malhotra)
हे पण वाचा… Immortal Human | नॅनोरोबोट्सच्या मदतीने माणूस अमर होईल…
ज्योतीने पाकिस्तानी गुप्तचर संस्थेशी संबंधित दानिशशी संपर्क साधला होता आणि लग्नाबाबत चर्चा करत होती. पाकिस्तानी नागरिकाशी लग्न करण्याबाबत अद्याप कोणताही ठोस पुरावा मिळालेला नाही. पोलीस आता ज्योतीच्या ऑनलाईन अकाऊंट्सवर फोकस करत आहेत. ज्योतीने कधी, कुठे आणि कोणत्या माध्यमातून पाकिस्तानशी संपर्क साधला हे शोधण्यासाठी तिचे सोशल मीडिया अकाउंट्स, ईमेल आणि मेसेजिंग एप्स तपासत आहेत. ज्योतीच्या फोन आणि लॅपटॉपमधून पोलिसांना अद्याप असा कोणताही डेटा सापडलेला नाही. पण पोलीस अजूनही तिच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत जेणेकरून संपूर्ण सत्य समोर येईल.