आण्विक धक्क्यांमुळे भूकंपाची चर्चा; रेडिएशनमुळे स्थलांतरात वाढ
वॉशिंग्टन : News Network
पाकिस्तानातील किराणा हिल्सवरील हल्ल्यामुळे रेडिएशनच्या भीतीचा प्रश्न अमेरिकेत पोहोचला आहे. व्हाईट हाऊसमध्ये पत्रकार परिषदेत अमेरिकेचे विमान रेडिएशनच्या भीतीमुळे पाकिस्तानमध्ये गेले का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर माझ्याकडे सांगण्यासाठी काही नाही असे अमेरिकन प्रवक्त्यांनी म्हटले आहे. आमच्याकडे अंदाज लावण्यासारखे देखील काही नाही असंही त्यांनी म्हटले आहे.

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्रालयाचे उपप्रवक्ते टॉमी पिगॉट यांनी हे उत्तर दिले. एकुणात या प्रश्नाचे उत्तर देण्याचे अमेरिकन प्रवक्त्यांनी थेट टाळल्याचे दिसून आले. प्रश्न सरळ होता की, अमेरिकेने पाकिस्तानमध्ये रेडिएशन लीकसाठी टीम पाठवली आहे का? मात्र यावर अमेरिका उत्तर टाळत असल्याचे स्पष्ट दिसून आले आहे.
पाकिस्तानच्या किराणा हिल्सवर भारताने हल्ला केल्याच्या बातम्या व्हायरल होत आहेत. या हल्ल्यामुळे किराणा हिल्स जवळची गावे स्थलांतरीत केली जात असल्याच्या बातम्या देखील व्हायरल होत आहेत. पाकिस्तानच्या किराणा हिल्सवर भारताने हल्ला केल्याच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल आहेत. भारताचा हा हल्ला एवढा अचूक होता की, तिथले एअर डिफेन्स सिस्टीमला कळलेही नाही असे म्हटले जात आहे.
किराणा हिल्सवर भारताने अटॅक केला आहे का? किराणा हिल्सवर पाकिस्तानचे न्यूक्लियर कमांड सेंटर असल्याचे पत्रकाराने म्हटले, त्यास उत्तर देताना एअर मार्शल ए. के. भारती यांनी भारताने किराणा हिल्सवर हल्ला केलेला नसल्याचे स्पष्ट केले. असाच प्रश्न पाकिस्तानी लष्करी अधिका-यांना विचारण्यात आला तेव्हा त्यांनीही याविषयी ठोस माहिती दिली नाही. यामुळे या हल्ल्याविषयी जगभरात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.