khabarbat

While China has provided Pakistan with long-range missiles and weapons, Israel has sent sophisticated weapons to India. This is likely to increase military tensions.

Advertisement

  • Advertise with khabarbat.com

युद्धज्वर वाढला..! पाकिस्तानधार्जिण्या दहशतवादावर भारत-इस्रायलचे ‘ऑपरेशन’!

नवी दिल्ली/कराची : वृत्तसंस्था
आंतरराष्ट्रीय स्तरावर एकाकी पडलेल्या पाकिस्तानच्या मदतीला अखेर चीन मैदानात उतरला. पाकिस्तानला चीनने लांब पल्ल्याचे मिसाईल, शस्त्रास्त्रे दिली असतानाच, इस्रायलने भारतासाठी अत्याधुनिक शस्त्रे पाठवली आहेत. यामुळे लष्करी तणाव वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, १५ इस्रायली नागरिक श्रीनगरला पोहोचल्याचीही माहिती आहे, ज्यामुळे संयुक्त ऑपरेशनची शक्यता वर्तवली जात आहे.

आधी या प्रकरणात रक्ताचे पाट वाहण्याची भाषा बोलणारा पाकिस्तान आता बॅकफूटवर आला आहे. या प्रकरणात इस्रायलने एन्ट्री घेऊन भारताची बाजू घेताच पाकिस्तानचा थरकाप उडाला आहे.

While China has provided Pakistan with long-range missiles and weapons, Israel has sent sophisticated weapons to India. This is likely to increase military tensions.
While China has provided Pakistan with long-range missiles and weapons, Israel has sent sophisticated weapons to India. This is likely to increase military tensions.

चीनने पाकिस्तानला १०० पेक्षा जास्त पीएल-१५ लॉन्ग रेंज एअर टू एअर हल्ला करु शकणारी मिसाइल्स दिली आहेत. हा तणाव कुठल्याही क्षणी मोठ्या युद्धात बदलू शकतो, हा त्यामागचा संदेश आहे. या मिसाइल्सची रेंज २०० किलोमीटर असल्याचे सांगितले जाते.

दरम्यान, भारत आणि इस्रायल मिळून काश्मीरमध्ये एखादे मोठे ऑपरेशन करण्याचे संकेत मिळत आहेत. तथापी पाकिस्तानचे नेते फवाद चौधरी यांनी इस्रायललाच भारत-पाकिस्तान तणावापासून दूर राहावे, असा इशारा दिला आहे. इस्रायलने भारताला विशेष हत्यारे पाठवली आहेत. त्यामुळे सैन्य तणाव वाढण्याची शक्यता वाढली आहे. अचूक निशाणा लावणा-या बॉम्बनी सज्ज एक विमान भारताच्या आदमपूर एअरबेसवर उतरले आहे, असे म्हटले जात आहे.

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवरुन माहिती दिली की, चिनी राजदूत जियांग जैदोंग यांनी उपपंतप्रधान/परराष्ट्र मंत्री सीनेटर मोहम्मद इशाक डार यांच्याशी चर्चा केली. दोघांनी सधाच्या परिस्थितीवर चर्चा केली.

भारताविरुद्ध लढाई एकट्या पाकिस्तानला पेलवणारी नाही. त्यामुळे ते नेहमीच चीनकडे हात पसरतात. आता सुद्धा त्यांनी तेच केले. चीनने शस्त्रास्त्र देण्यापासून आंतरराष्ट्रीय स्तरावर नेहमीच पाकिस्तानची पाठराखण केली आहे. चीनकडे संयुक्त राष्ट्रात वीटो पावर आहे. चीनने अनेकदा पाकिस्तानसाठी या वीटो पावरचा अधिकार सुद्धा वापरला आहे.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

ताज्या बातम्या

Translate »