khabarbat

Defence Minister Rajnath Singh presented a positive stand on proposal to set up a defence park in the Aurangabad’s industrial area.

Advertisement

  • Advertise with khabarbat.com

संभाजीनगरात डिफेन्स पार्क; राजनाथ सिंग बैठक घेणार!

छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी
शहराच्या औद्योगिक परिसरात डिफेन्स पार्क व्हावे, यासाठी ठोस प्रस्ताव घेऊन दिल्लीत या, याबाबत अधिका-यांशी चर्चा करून त्याबाबत निर्णय घेऊ, अशी सकारात्मक भूमिका संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी शुक्रवारी येथे चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अ‍ॅण्ड अ‍ॅग्रिकल्चर (सीएमआयए)तर्फे आयोजित उद्योजकांच्या बैठकीत मांडली. या संदर्भात दिल्लीत येऊन चर्चा करण्याचे निमंत्रणही संरक्षणमंत्र्यांनी ‘सीएमआयए’च्या पदाधिका-यांना दिले.

हे पण वाचा…. अंबाजोगाई तालुक्यात महिला वकिलाला बेदम मारहाण; राजकारण तापले!

‘सीएमआयए’तर्फे आयोजित ‘मराठवाडा : आत्मनिर्भर भारताची रक्षणभूमी’ या उपक्रमांतर्गत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औद्योगिक संघटनांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे, ओबीसी कल्याणमंत्री अतुल सावे, मंत्री जयकुमार रावल, खासदार डॉ. भागवत कराड, आदींची उपस्थिती होती.

राजनाथ सिंह म्हणाले की, आपण दिल्लीत संरक्षण पार्कसंबंधी ठोस प्रस्ताव घेऊन या. अधिका-यांशी चर्चा करून या संदर्भात काय करता येईल ते पाहू.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

ताज्या बातम्या

Translate »