khabarbat

The US government agreement of several big advisory companies, led by Tesla and X CEO Elon Musk, has either canceled or reduced. The most hit by this decision is to companies like Delite Accenture and IBM.

Advertisement

  • Advertise with khabarbat.com

Tarrif War | ट्रम्प टॅरिफचा वरवंटा फिरला; २.८ लाख कर्मचा-यांवर गंडांतर

 

वॉशिंग्टन : News Network
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणामुळे जगभरातील अर्थव्यवस्था धोक्यात आल्या आहेत. भारतात ऑटो, आयटी आणि फार्मा क्षेत्राला टॅरिफचा फटका बसला आहे. टाटासारख्या कंपनीने जग्वार लँड रोव्हर ब्रँडच्या लक्झरी कार अमेरिकेत निर्यात करणे थांबवले आहे. याचा परिणाम देशातील नोक-यांवरही होणार आहे. पण, यातून खुद्द अमेरिकाही सुटलेला नाही. अमेरिकेत ट्रम्प यांच्या निर्णयाचा परिणाम आता मोठ्या कंपन्यांच्या कर्मचा-यांवर होणार आहे.

एका अहवालानुसार, डेलॉइटसह अनेक मोठ्या कंपन्यांमधील कर्मचा-यांवर नोकर कपातीची टांगती तलवार आहे. डेलॉइट ही एकमेव अशी कंपनी नाही, जिथे कर्मचारी कपात होईल. बूझ अ‍ॅलन हॅमिल्टन, अ‍ॅसेंचर फेडरल सर्व्हिसेस आणि आयबीएम यांसारख्या मोठ्या कंपन्यांचे डझनभर करारही संपुष्टात आले आहेत.

Kerala shocked : Did you seen this Video…. just click and open it

टेस्ला आणि एक्सचे सीईओ इलॉन मस्क यांच्या नेतृत्वाखाली अनेक बड्या सल्लागार कंपन्यांचे सरकारी करार एकतर रद्द किंवा कमी करण्यात आले आहेत. या निर्णयाचा सर्वाधिक फटका डेलॉइट, अ‍ॅसेंचर आणि आयबीएमसारख्या कंपन्यांना बसला आहे.

ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, एकट्या डेलॉइटने १२७ पेक्षा जास्त सरकारी करार रद्द किंवा सुधारित केले आहेत, परिणामी अंदाजे ३७२ मिलियन डॉलरची बचत झाली आहे. आता डेलॉइट आपल्या सरकारी आणि सार्वजनिक सेवा विभागातील कर्मचा-यांना काढून टाकण्याची तयारी करत आहे. बूझ अ‍ॅलन हॅमिल्टन, अ‍ॅसेंचर फेडरल सर्व्हिसेस आणि आयबीएम यांसारख्या मोठ्या कंपन्यांचे डझनभर करारही संपुष्टात आले आहेत. त्याचप्रमाणे, एक्सेंचरचे ३० करार रद्द करण्यात आले आहेत. या कंपन्यांना त्यांच्या खर्चात २५-३०% कपात करून त्यांच्या सेवा खरोखर अत्यावश्यक असल्याचे सिद्ध करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

ताज्या बातम्या

Translate »