Special Story
जगातील प्रत्येक देशात कंडोमची किंमत ही वेगवेगळी आहे. काही ठिकाणी ते अगदी स्वस्तात मिळते, तर काही ठिकाणी ते इतके महाग आहे की सामान्य लोक विकत घेताना किमान १० वेळा विचार करतील. कंडोमची किंमत ही सरकारी धोरणे, कर, उत्पादन खर्च आणि बाजारातील मागणी यावर अवलंबून असते. काही देशांमध्ये कंडोम इतके महाग आहेत की ते सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर पोहोचले आहेत.

दक्षिण अमेरिका खंडाच्या उत्तर भागातील व्हेनेझुएला या देशाची अर्थव्यवस्था अनेक वर्षांपासून संकटात आहे. २०१५ मध्ये, येथे कंडोमच्या पॅकेटची किंमत ७५० यूएस डॉलर (सुमारे ६५,००० रुपयांपेक्षा जास्त) पर्यंत पोहोचली होती. याचे कारण देशातील उत्पादनाचा अभाव आणि महागडे आयात शुल्क हे होते. येथील चलनाचे मूल्य घसरल्याने जीवनावश्यक वस्तू महाग झाल्या. (popular condom)
टीव्हीपेक्षा कंडोम महाग
२००८-०९ मध्ये झिम्बाब्वेची आर्थिक परिस्थिती इतकी बिकट झाली की, कंडोमच्या (condom) पॅकेटची किंमत छोट्या टीव्हीपेक्षा जास्त झाली. परिस्थिती इतकी बिकट होती की लोकांना ते काळ्या बाजारातून विकत घ्यावे लागले.
स्वित्झर्लंड हा जगातील सर्वात महाग देशांपैकी एक आहे आणि हे आरोग्य उत्पादनांमध्ये देखील दिसून येते. येथे ब्रँडेड कंडोमची किंमत खूप जास्त आहे. या देशात सामान्यपणे १० कंडोमच्या पॅकेटची किंमत ८ ते १२ यूएस डॉलर (७००-१००० रुपये) दरम्यान आहे.
कर वाढीचा परिणाम
नॉर्वे आणि डेन्मार्कमध्येही कंडोम महाग आहेत. इथे आरोग्याशी निगडित वस्तूंवर प्रचंड कर लावला जातो, त्यामुळे किमती वाढतात. उदाहरणार्थ, नॉर्वेमध्ये कंडोमच्या एका पॅकेटची किंमत १० ते १५ डॉलर्स (८००-१२०० रुपये) असू शकते. तथापि, सरकार मोफत कंडोमचे वितरण देखील करते, ज्यामुळे गरजू लोकांना थोडासा दिलासा मिळतो.
स्पेशल कंडोम महाग
जपानमध्ये रेग्युलर कंडोमची किंमत जास्त नाही, पण जर एखाद्याला खास डिझाईन केलेला किंवा अति-पातळ कंडोम घ्यायचा असेल तर त्याची किंमत खूप जास्त असू शकते. येथे काही प्रीमियम कंडोमची किंमत १५ ते २० डॉलर्स (१२००-१६०० रुपये) पर्यंत आहे. (expensive condom)