नवी दिल्ली : khabarbat News Network
ध्वनी हा हवेतील तरंग लहरींमधून प्रवास करतो. मात्र, या लहरींना पसरायची प्रवृत्ती (डिफ्रॅक्शन) असते. विशेषत: कमी फ्रिक्वेन्सीच्या ध्वनीलहरी अधिक विस्तारतात, त्यामुळे त्यांना मर्यादित जागेत रोखणे कठीण होते.

विशिष्ट दिशेत ध्वनी पोहोचविण्यासाठी काही तंत्रज्ञान आधीपासून उपलब्ध आहे, जसे की पॅरामेट्रिक ऍरे स्पीकर. पण, ते संपूर्ण मार्गावर ऐकू येतात. नव्या संशोधनाने ‘स्वत: वाकणा-या अल्ट्रासाऊंड किरणां’चा वापर केला आहे. अल्ट्रासाऊंड हा 20KHz पेक्षा जास्त फ्रिक्वेन्सी असलेला ध्वनी आहे, जो माणसाला ऐकू येत नाही. त्यामुळे संशोधकांनी अल्ट्रासाऊंडला वाहक म्हणून वापरले, ज्यामुळे तो न ऐकू येता जागा पार करू शकतो आणि योग्य ठिकाणीच ऐकू येतो.
संशोधकांनी दोन वेगळ्या फ्रिक्वेन्सीचे (उदा. 40KHz आणि ३९.५ KHz) अल्ट्रासाऊंड किरण वापरले. हे किरण जेव्हा एका विशिष्ट ठिकाणी जमतात, तेव्हा त्यांच्या परस्पर संयोगातून एका नव्या, ऐकू येणा-या फ्रिक्वेन्सीची निर्मिती होते. ही प्रक्रिया ‘डिफरन्स फ्रिक्वेन्सी जनरेशन’ म्हणून ओळखली जाते. विशेष म्हणजे, ‘अकौस्टिक मेटा सरफेस’ नावाच्या तंत्रज्ञानाचा वापर केला आहे, जे ध्वनीलहरींच्या प्रवासाचा मार्ग वाकवू शकते. यामुळे, अडथळ्यांच्या आजूबाजूने फिरणारा आणि विशिष्ट ठिकाणी एकत्र होणारा ध्वनी तयार करता येतो.