कॅनडाहून विक्की आणि प्रिया त्यांच्या लग्नासाठी बंगळुरूत आले होते. दोन्ही कुटुंबात मोठा आनंद आणि उत्साह होता. या लग्नातील फोटो काही खास बनविण्याचं प्लॅनिंग होतं. त्यासाठी हवेत रंगीबेरंगी धूर सोडणा-या फटाक्यांचा वापर करण्याचे ठरले. फोटोला रंगीत बॅकग्राऊंड बनवण्यानं ते आणखी सुंदर दिसतात. जेव्हा फोटोग्राफर फोटो काढतील तेव्हा जोडप्याच्या बॅकग्राऊंडला फटाके फुटतील असं ठरलं होतं.

परंतु प्रत्यक्षात असे घडलेच नाही आणि ठरवलेलं प्लॅनिंग जीवावर बेतलं. वेडिंग फोटोशूटवेळी नवरा नवरीला उचलणार, तितक्यात रंगाचे फटाके बॅकग्राऊंडला सुरक्षित फुटणार होते परंतु ते जोडप्याच्या दिशेने आले, त्यात नवरी प्रिया फटाक्यांच्या स्फोटात अडकली, या फटाक्यामुळे नवरीची पाठ भाजली आणि केसही जळाले. ही भयानक घटना घडल्यानंतर सगळीकडे सन्नाटा पसरला.