हैदराबाद : khabarbat News Network
flying kiss | सनरायझर्स हैदराबादच्या संघानं होम पीचवर रंगलेल्या पहिल्या लढतीत राजस्थान रॉयल्सच्या संघाला मात देत यंदाच्या हंगामाची दमदार सुरुवात केली. सनरायझर्सकडून पदार्पण करताना इशान किशन याने शतकी खेळीसह या सामन्यात खास छाप सोडली. तो ४७ चेंडूत १०६ धावांवर नाबाद राहिला.


IPL कारकिर्दीतील पहिल्या शतकी खेळीनंतर त्याने खास अंदाजात सेलिब्रेशन केल्याचे पाहायला मिळाले. मैदानातील क्लासिक खेळी दरम्यान त्याचा flying kiss चर्चेचा ठरला. त्याचा हा विजयी अविर्भावातील फ्लाइंग किस कुणासाठी होता? असा प्रश्न अनेकांना साहजिकच पडला. एवढेच नाही तर काहींनी यासंदर्भातील आडाखे बांधत हा फ्लाइंग किस काव्या मारन करिताच होता असे छातीठोकपणे सांगायला सुरूवात केली. Kavya Maran ची देहबोली आणि ‘इशू’च्या फ्लाईंग किसमधील उत्स्फूर्तता यांचा मिलाफ घडवत त्याचं उत्तरही देण्याचा प्रयत्न केला. कदाचित, काव्याने ईशानवर दाखविलेला विश्वास, आणि ईशानने अनपेक्षितपणे बॅटिंगची आतिषबाजी करीत झळकावलेले शतक याबद्द्ल दोघांनीही एकमेकांविषयी व्यक्त केलेला आदरयुक्त कृतज्ञभाव याचे ते निदर्शक असू शकत नाही का?
(Ishan Kishan) इशान किशनच्या फ्लाइंग किससंदर्भात रंगणा-या चर्चेत अनेकजण आप-आपल्या परीने प्रतिक्रिया देताना दिसले. यात एका नेटक-याने त्याचा हा तोरा मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) आपल्यातील धमक दाखवून देण्याचा एक इशारा होता, असा अंदाज बांधला आहे. व्हायरल होणा-या पोस्टमध्ये इशान किशन याचा फ्लाइंग किस हा काव्या मारनसाठी नाही तर तो मुंबई इंडियन्ससाठी आहे, असे वाटते, अशा आशयाची प्रतिक्रियाही उमटल्याचे पाहायला मिळते.