khabarbat

In 2023, IT companies laid off 26,4,22 employees, while between 2022 and 2024, a whopping 5,81,961 people lost their jobs.

Advertisement

  • Advertise with khabarbat.com

IT Job | ३ वर्षात ५ लाखाहून अधिक Tech savvy तरुण बेरोजगार!

नवी दिल्ली : khabarbat News Network
खर्च कमी करण्याच्या उद्देशाने टेक कंपन्यांनी या वर्षात २३,१५४ कर्मचा-यांना नोकरीवरून काढून टाकले आहे. उत्पन्न घटल्याने कंपन्यांना खर्चात मोठ्या प्रमाणावर कपात करावी लागत आहे. २०२३ मध्ये IT कंपन्यांनी २६,४,२२ कर्मचा-यांची कपात केली तर २०२२ ते २०२४ या काळात तब्बल ५,८१,९६१ लोकांना हातातील काम गमवावे लागले.

हे पण वाचा…. इलॉन मस्कमुळे भारतीय IT तंत्रज्ञ, कंपन्यांची डोकेदुखी वाढली!

कर्मचारी कपातीवर नजर ठेवणा-या ‘लेऑफ्स डॉट एफवायआय’ या संस्थेनुसार, यंदाच्या कपातीची सुरुवात ६ जानेवारीपासून झाली. सुरुवातीला इस्रायलच्या सोलरएज कंपनीने ४०० जणांना कमी केलं. ओला इलेक्ट्रिकने भारतात १ हजार कर्मचा-यांना कामावरून काढलं. मेटाने यंदा आतापर्यंत सर्वाधिक ३,६०० तर मेटा- ३,६००, एचपीई- २,५००, एचपी- २,०००, वर्क डे- १,७५०, ऑटो डेस्क- १,३५०, ओला इलेक्ट्रिक- १,०००, ब्लू ओरिजिन- १,०००, क्रूझ- १,०००, सेल्सफोर्स- १,००० लोकांना नोकरीवरून कमी केलं.

मार्च महिन्याच्या अखेरीस मॉर्गन स्टॅन्ली सुमारे २,००० कर्मचा-यांना नोकरीतून काढण्याची शक्यता आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार खर्च कमी करण्याबरोबरच कंपनी एआय आणि ऑटोमेशनवर लक्ष केंद्रित करत आहे. अमेझॉननेदेखील १४ हजार व्यवस्थापकांना नोकरीतून काढण्याची घोषणा केली आहे. यामुळे कंपनीला दरवर्षी २.१ अब्ज डॉलर ते ३.६ अब्ज डॉलरची बचत होईल.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

Translate »