khabarbat

The Nagpur bench of the Bombay High Court on Friday rejected the bail application of terrorist Rais Ahmed Sheikh, who conducted reconnaissance of the Rashtriya Swayamsevak Sangh headquarters and sent the information to Umar in Pakistan.

Advertisement

  • Advertise with khabarbat.com

RSS | संघ मुख्यालयाची रेकी; जामीन अर्ज फेटाळला

नागपूर : khabarbat News Network
रेशीमबाग येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालयाची रेकी करून ती माहिती पाकिस्तानमधील उमर याला पाठविणारा दहतवादी रईस अहमद शेख याचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी फेटाळून लावला. न्यायमूर्तीद्वय नितीन सूर्यवंशी व प्रवीण पाटील यांनी हा निर्णय दिला.

रईस जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील पोरा येथील रहिवासी आणि जैश-ए-मोहम्मद या बंदी घालण्यात आलेल्या दहशतवादी संघटनेचा सदस्य आहे. सुरक्षा यंत्रणांनी त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवल्यानंतर त्याचा कट उघडकीस आला. मुख्य सरकारी वकील ज्येष्ठ विधिज्ञ देवेंद्र चव्हाण यांनी रईसच्या दहशतवादी कनेक्शनबाबत न्यायालयाला ठोस माहिती दिली. रईसविरुद्ध यापूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये जिवंत हातबॉंब बाळगल्याप्रकरणी खटला दाखल आहे. न्यायालयाने उपलब्ध पुराव्याच्या आधारावर रईसला जामीन नाकारला. राष्ट्रीय सुरक्षेसाठी त्याला कारागृहात ठेवणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

Translate »