khabarbat

The Karnataka cabinet gave four percent reservation to the Muslim community in awarding contracts. After BJP MLAs opposed this, they were marshaled and taken out of the house.

Advertisement

  • Advertise with khabarbat.com

Muslim reservation | कर्नाटक विधानसभेत मुस्लिम आरक्षणाला गदारोळात मंजुरी

बंगळुरु : khabarbat News Network
हनी ट्रॅप प्रकरणावरून कर्नाटक विधानसभेत शुक्रवारी मोठा गदारोळ झाला. भाजपचे आमदार सभागृहाच्या वेलमध्ये शिरले. त्यांनी अध्यक्षांच्या खुर्चीसमोर कागदपत्रे फाडली आणि भिरकावली. या गोंधळामुळे कर्नाटक विधानसभेचे कामकाज तहकूब करण्यात आले. दरम्यान, या गोंधळातच राज्य सरकारने सरकारी कंत्राटांमध्ये मुस्लिमांना ४ टक्के आरक्षण देणारे विधेयक मंजूर केले. भाजपने हा निर्णय असंवैधानिक असल्याचे सांगत त्याला कायदेशीररित्या आव्हान देणार असल्याचे म्हटले आहे.

काही मंत्र्यांसह प्रभावी नेत्यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा विषय सध्या कर्नाटक विधानसभेत गाजत आहे. आज शुक्रवारी देखील या प्रकरणाचे पडसाद विधानसभेत उमटले.

The Karnataka cabinet gave four percent reservation to the Muslim community in awarding contracts. After BJP MLAs opposed this, they were marshaled and taken out of the house.
The Karnataka cabinet gave four percent reservation to the Muslim community in awarding contracts. After BJP MLAs opposed this, they were marshaled and taken out of the house.

भाजपच्या १८ आमदारांचे निलंबन
कर्नाटक मंत्रिमंडळाने शुक्रवारी कर्नाटक ट्रान्सपेरेंसी इन पब्लिक प्रोक्योरमेंट्स अधिनियमात दुरूस्ती करण्यास मंजुरी दिली. त्यानुसार दोन कोटीपर्यंतचे कंत्राट देण्यासाठी मुस्लीम समाजाला चार टक्के आरक्षण दिले. भाजप आमदारांनी याला विरोध केल्यानंतर मार्शलद्वारे त्यांना उचलून सभागृहाबाहेर काढले. त्यानंतर आरक्षणाचे विधेयक संमत झाले. तसेच सभागृह अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले. भाजपच्या १८ आमदारांचे सहा महिन्यांसाठी निलंबन करण्यात आले आहे.

१०० टक्के पगारवाढ मंजूर
कर्नाटकात मुख्यमंत्र्यांचा पगार ७५ हजार रुपयांवरुन १.५ लाख रुपये प्रति महिना असा होणार आहे. तसेच विधानसभा सभापती आणि विधानसभा अध्यक्षांचे वेतन ७५ हजारावरुन १.२५ लाख रुपये महिना असे होईल.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

Translate »