नवी दिल्ली : khabarbat News Network
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आपल्या भूमिकेवर अडून राहिल्याने अखेर टॅरिफ वॉर भडकलं आहे. चीन, कॅनडा आणि मेक्सिको या देशांनी अमेरिकेवर रेसिप्रोकल Tarrif लादण्याची घोषणा यापूर्वीच केली. आता भारतानेही उडी घेतली आहे. टॅरिफ लादण्यासाठी भारताने २०० दिवसांचा मास्टर प्लॅन आखला आहे. या निर्णयामुळे चीन, दक्षिण कोरिया आणि जपानला मोठा फटका बसू शकतो.

केंद्र सरकार काही वर्षांपासून स्वदेशी उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपायोजना करत आहे. देशांतर्गत स्टीलला आयात वाढीपासून संरक्षण देण्याच्या उद्देशाने २०० दिवसांसाठी काही स्टील उत्पादनांवर १२ टक्के तात्पुरता सुरक्षा शुल्क लागू करण्याची शिफारस केली. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये फॅब्रिकेशन, पाईप उत्पादन, उत्पादन, भांडवली वस्तू, ऑटो, ट्रॅक्टर, सायकल आणि इलेक्ट्रिकल पॅनेलसह विविध उद्योगांमध्ये वापरल्या जाणा-या मिश्रधातू नसलेल्या आणि मिश्र धातुच्या स्टीलच्या फ्लॅट उत्पादनांच्या आयातीत अचानक वाढ झाल्याने चौकशी सुरू केली होती.
आर्सेलर मित्तल निप्पॉन स्टील इंडिया, एएमएनएस खोपोली, JSW steel, जेएसडब्ल्यू स्टील कोटेड उत्पादने, भूषण पॉवर अँड स्टील, जिंदाल स्टील अँड पॉवर आणि (SAIL) स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड या संघाचे सदस्य आहेत. भारतात या उत्पादनांच्या आयातीत अचानक वाढ झाली आहे. याचा फटका देशांतर्गत उद्योग/उत्पादकांना बसण्याचा धोका आहे.