khabarbat

Although the rupee is trading lower against the dollar after a 3-day rally on Wednesday, it could be seen making history.

Advertisement

  • Advertise with khabarbat.com

Rupee rise again | डॉलरची घसरण सुरूच; रुपया पुन्हा वधारणार

 

मुंबई : khabarbat News Network
ऑक्टोबर २०२४ पासून सातत्याने घसरण होणा-या शेअर बाजाराला अखेर ब्रेक लागला. सेन्सेक्स सुमारे ११३० पॉईंटने वधारल्याने गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. दुसरीकडे भारतीय रुपया देखील मजबुतीकडे वाटचाल करत आहे. वास्तविक, बुधवारी ३ दिवसांच्या वाढीनंतर रुपया डॉलरच्या तुलनेत घसरणीसह व्यवहार करत असला तरी, रुपया इतिहास रचताना दिसू शकतो.

सध्या भारताचा मॅक्रो डेटा जगातील इतर देशांपेक्षा आणि अगदी अमेरिकेपेक्षाही चांगला दिसत आहे. दुसरीकडे कच्च्या तेलाच्या किमती घसरल्याचा फायदाही येत्या काही दिवसांत पाहायला मिळू शकतो. गेल्या काही दिवसांबद्दल बोलायचे झाले तर, रुपयाच्या वाढीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरचे गर्वहरण झाले असून बाजारात चांगलीच वाढ झाली आहे. तीन व्यापार सत्रांमध्ये डॉलरच्या तुलनेत रुपया ०.७६ टक्क्यांनी वाढला आहे. विशेष बाब म्हणजे गेल्या महिन्यातील नीचांकी कालावधीच्या तुलनेत रुपया दीड टक्क्यांहून अधिक वधारला आहे. जर अंदाज खरा ठरला तर डॉलरच्या तुलनेत ही रिकव्हरी २ टक्क्यांहून अधिक असू शकते.

त्याआधी डॉलरच्या तुलनेत रुपया सलग ३ दिवस वधारत आहे. मंगळवारी सलग तिस-या सत्रात वाढ नोंदवत रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत २५ पैशांनी वाढून ८६.५६ वर बंद झाला. तीन दिवसांत डॉलरच्या तुलनेत रुपया ६६ पैशांनी वाढला. गुरुवारी मागील सत्रात १७ पैशांनी वाढून ८७.०५ वर बंद झाल्यानंतर सोमवारी रुपया २४ पैशांनी वाढून ८६.८१ वर बंद झाला. आकडेवारीनुसार, फेब्रुवारी महिन्यात रुपयाने डॉलरच्या तुलनेत ८७.९४ ही लाईफटाईम नीचांकी पातळी गाठली होती. तेव्हापासून रुपयात १.५० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.

डॉलरचे गर्वहरण
दुसरीकडे, डॉलरच्या निर्देशांकात सातत्याने घसरण सुरू आहे. बुधवारी थोडीशी वाढ दिसून येत असून तो १०३ च्या वर व्यवहार करत आहे. सहा चलनांच्या तुलनेत डॉलरची ताकद मोजणारा अमेरिकन डॉलर निर्देशांक ०.१५ टक्क्यांनी वाढून १०३.३९ वर व्यापार करत होता. मात्र, जानेवारी महिन्यात डॉलर निर्देशांक ११०.१८ चा उच्चांक गाठला होता. यूएस फेडरल रिझर्व्हच्या व्याजदराच्या निर्णयापासून बाजारातील संकेतांची वाट पाहत असताना डॉलर निर्देशांकात सुधारणा झाल्याचे दिसून आले.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

Translate »