नवी दिल्ली : प्रतिनिधी
Retail Inflation Rate falls | किरकोळ महागाई दरात मोठी घसरण झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात किरकोळ महागाई दर ३.६१ टक्क्यांवर आला आहे. जानेवारी महिन्यात हाच महागाई दर ४.३१ टक्क्यांवर होता. गेल्या सात महिन्यांच्या निचांकी पातळीवर महागाई दर गेला आहे. जुलै २०२४ मध्ये महागाई दर हा ३.६० टक्के राहिला होता.

सात महिन्यांच्या निचांकी पातळीवर महागाई दर पुन्हा पोहोचला आहे. महागाई दर ४ टक्क्यांच्या खाली आल्याने पुन्हा एकदा रेपो रेट कमी होण्याची शक्यता अधिक निर्माण झाली आहे. आरबीआयने २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी महागाई दर ४.२ टक्के राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. रायन्सेस प्रायवेट लिमिटेडचे एमडी आणि सीईओ संजय कुमार यांनी सीपीआय महागाई निर्देशांक ५ टक्क्यांच्या खाली आला आहे, असं म्हटलं. खाद्य पदार्थातील किमती घटल्याने ही स्थिती पाहायला मिळत आहे. खाद्य पदार्थाच्या किमतीवरील नियंत्रण कायम ठेवून विक्री वाढवण्याचा प्रयत्न आहे. किरकोळ महागाई दर ४ टक्क्यांपर्यंत असल्याने व्याज दरात कपात शक्य असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. (inflation rate update)
किरकोळ महागाई दर मोजण्यासाठी सरकारने २९९ प्रकारच्या वस्तू आणि सेवांचा समावेश केला आहे. यामध्ये अन्नपदार्थ, कपडे, इंधन, निवासस्थान इत्यादींचा समावेश आहे. केंद्र सरकारचे सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय या गोष्टींच्या किमतींवरील माहिती गोळा करते आणि त्या आधारावर महागाई दराचे आकडे वेळोवेळी सादर करते.