khabarbat

2024 elections

Advertisement

  • Advertise with khabarbat.com

MPSC च्या सर्व स्पर्धा परीक्षा मराठीतच होणार!

 

मुंबई : प्रतिनिधी

एमपीएससीच्या माध्यमातून घेतल्या जाणा-या सर्व स्पर्धा परीक्षा मराठीमध्ये घेतल्या जातील, अशी महत्त्वाची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत केली. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मूळात या ज्या परीक्षा आहेत, त्या मराठी आणि इंग्रजी दोन्हीमध्ये घेतो, पण न्यायालयाने आपल्याला असा एक निर्णय दिला होता की, त्यातील काही परीक्षा अशा आहेत. कृषी अभियांत्रिकीशी संबंधित ज्या परीक्षा आहे, त्या आपण मराठीत घेत नाहीत, इंग्रजीतच घेतो.

या मुद्द्यावर फडणवीस पुढे म्हणाले की, न्यायालयासमोर हा विषय गेल्यानंतर एक बैठक झाली आणि त्या बैठकीत असा विषय आला की, याची पुस्तके काही उपलब्ध नाहीत. त्यामुळे ते न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. न्यायालयानेही ते मान्य केले.

आता राज्य सरकारने असा निर्णय केलेला आहे की, जरी याची पुस्तके उपलब्ध नसतील, तरीही नव्या शैक्षणिक धोरणामध्ये आपल्याला अभियांत्रिकी देखील मराठीत घेण्याची मुभा मिळालेली आहे. म्हणून जे टेक्निकल कोर्सेस ज्याची एमपीएससी परीक्षा मराठीमध्ये घेत नाहीत. कारण त्याची पुस्तके उपलब्ध नाहीत. त्याची पुस्तके तयार करण्यात येतील. त्याचा एक कालबद्ध कार्यक्रम आखण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

ताज्या बातम्या

Translate »