khabarbat

Farmer-Police Clash in Punjab

Advertisement

  • Advertise with khabarbat.com

Farmers Protest | शेतकरी-पोलिसांत झटापट; पंजाबात ७ आंदोलक जखमी

 

farmers protest in Punjab
पंजाबमधील गुरदासपूर येथे आज (दि. ११) शेतकरी आणि पोलिसांमध्ये झालेल्या जोरदार झटापटीमध्ये ७ जण जखमी झाले आहेत. एक्स्प्रेस वे साठी आमच्या जमिनींचा जबरदस्तीने ताबा घेतला जात आहे, तसेच या जमिनीचा योग्य मोबदला दिला जात नाही, असा आरोप शेतक-यांनी केला आहे.
Police-farmers clash in Punjab
५ मार्च रोजी चंदीगडमध्ये आंदोलनावरून शेतकरी आणि पोलीस आमने सामने आले होते. शेतकरी संघटनांनी भगवंत मान यांच्या नेतृत्वाखालील सरकारविरोधात आंदोलन केले होते. तसेच सरकारच्या भूमिकेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली होती.
farmers-police clash at Gurudaspur in Punjab
५ मार्चपासून एक आठवडाभर आंदोलन करण्याचे नियोजन होते. तसेच संपूर्ण पंजाबमधून येथे शेतकरी येणार होते. मात्र तत्पूर्वीच पोलिसांनी आंदोलक शेतकरी नेत्यांना ताब्यात घेतले. तसेच आंदोलक शेतक-यांना वाटेतच अडवले.
Farmer-Police Clash in Punjab
आंदोलक शेतक-यांनी घडलेल्या घटनेबाबत सांगितले की, दिल्ली-कटरा एक्स्प्रेस महामार्गासाठी जमिनीचे अधिग्रहण करण्यावरून वाद सुरू आहे. गुरदासपूरमध्ये जमिनीचा ताबा घेण्यावरून शेतकरी आंदोलक आणि पोलिसांमध्ये वाद झाला. प्रशासनाने कुठलीही पूर्वसूचना न देता आमची जमीन ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला.
तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

ताज्या बातम्या

Translate »