मुशी : News Network
काँगोमध्ये मोठा बोट अपघात झाला आहे. येथे एक बोट उलटल्याने २५ जणांचा मृत्यू झाला. या बोटीवर अनेक फुटबॉलपटूही होते. प्रांत प्रवक्ते ऍलेक्सिस म्पुटू यांनी म्हटले आहे की, हे खेळाडू माई-न्डोम्बे प्रांतातील मुशी शहरात एका सामना खेळून परतत असताना त्यांना घेऊन जाणारी बोट नदीत उलटली.

मुशीचे स्थानीय अधिकारी रेनेकल क्वातिबा यांनी दिलेल्या माहितीनुसार, बोट अपघातानंतर आतापर्यंत जवळपास ३० लोकांना वाचवण्यात यश आले आहे. मात्र, अनेक लोक अद्यापही बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे. खरे तर, रात्रीच्या वेळी काँगोमध्ये असे बोट अपघात सामान्य आहेत. कारण येथील वाहतुकीचे मुख्य माध्यम नद्याच आहेत. (congo news update)
पुरूष सारे बुद्धू… पण का?? जाणून घेण्यासाठी वाचा….
काँगोमध्ये रस्ते आणि इतर वाहतुकीच्या सुविधा उपलब्ध नसलेल्या दुर्गम भागांतील नागरिकांसाठी नदी हा वाहतुकीचा एक मुख्य पर्याय आहे. महत्वाचे म्हणजे, काँगोतील १० कोटींहून अधिक लोक हे नद्यांवर अवलंबून आहेत.