khabarbat

मुघल खजिन्याचा नाद : बु-हाणपूर किल्ल्यात हजारोंची झुंबड

Advertisement

  • Advertise with khabarbat.com

मुघल खजिन्याचा नाद : बु-हाणपूर किल्ल्यात हजारोंची झुंबड

बु-हाणपुर : प्रतिनिधी
छावा सिनेमानंतर संभाजी महाराजांनी मुघल साम्राज्याला हादरा देण्यासाठी लुटलेल्या बु-हाणपूरला खूप महत्व आले आहे. तेथील लोकांना बु-हाणपूरच्या किल्ला परिसरात मुघलांनी खजिना पुरल्याची शंका आहे, यामुळे अचानक एका रात्री हजारोंच्या संख्येने लोकांनी किल्ल्याच्या आजुबाजुच्या परिसरात बॅटरी, मेटल डिटेक्टर घेऊन खोदाई सुरु केली. पोलिसांना समजेपर्यंत सकाळ झाली होती. या काळात काही लोकांना सोने मिळाल्याचे दावे केले जात आहेत.

पोलिसांना याची खबर मिळाली परंतू, त्यांना घटनास्थळी जाण्यास दुपार झाली होती. तिथे त्यांना जागोजागी खड्डेच खड्डे दिसत होते. परंतू, त्यांना सोन्याची नाणी आणि ते शोधणारे लोक काही मिळालेले नाहीत. छावा चित्रपटामुळे स्थानिकांमध्ये पुन्हा या किल्ला परिसरात मुघलांनी सोने लपविले असल्याची चर्चा सुरु झाली. आणि बुधवारी सायंकाळी ७ वाजता तिथे एकेक व्यक्ती कुदळ, खुरपे, चाळण घेऊन पोहोचू लागला. काहींनी सोबत मेटल डिटेक्टरही आणले होते. रात्रीच्या अंधारात या भागात काजवे चमकतात तसे रुप आले होते.

इंदूर ते हैदराबाद हा राष्ट्रीय महामार्ग तयार करण्यासाठी खोदकाम सुरू आहे. येथे तीन महिन्यांपूर्वी शेतात सोन्याची नाणी सापडल्याची अफवा पसरली होती. ‘छावा’ या चित्रपटात तर मुघलांचा खजिना येथे ठेवण्यात आल्याचे सांगितले गेले. तेव्हापासून खजिन्यासाठी येथे खोदणा-यांची संख्या वाढू लागली आहे. पुरातत्त्व समितीचे सदस्य शालिकराम चौधरी म्हणाले की, बुरहानपूरमध्ये सोन्या-चांदीच्या नाण्यांसाठी टांकसाळ होती. असीरगढ येथे उत्खननादरम्यान प्रत्येक वेळी काही ना काही सापडते.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

ताज्या बातम्या

Translate »