भोपाळ : News Network
मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ (bhopal) येथे आयोजित केलेल्या Investor Summit मध्ये देश-विदेशातील मोठे उद्योगपती आणि गुंतवणूकदार सहभागी झाले. दोन दिवस चाललेल्या समिटमध्ये उद्योगपतींनी मध्य प्रदेशात मोठी गुंतवणूक केली. पण जेवणाच्या कार्यक्रमादरम्यान जागतिक गुंतवणूकदारांच्या समिटमध्ये घडलेल्या प्रकारामुळे या कार्यक्रमाची नाचक्की झाली आहे.

या कार्यक्रमात सहभागी झालेल्यांनी जेवणासाठी धक्काबुक्की केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून लोक खाण्यासाठी ताट एकमेकांकडून हिसकावताना दिसत आहेत.
हे पण वाचा…. Aashiqui | आशिक मिजाज लोकांचे अनोखे गाव; जिथे इश्क पे कोई जोर नहीं!
दरम्यान, मध्य प्रदेशातल्या ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिटवर सुमारे ८१ कोटी रुपये खर्च करण्यात आले. या गुंतवणुकीच्या महाकुंभाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते. ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिटमध्ये भाग घेण्यासाठी देशभरातून आणि जगभरातून सुमारे २५,००० पाहुणे भोपाळमध्ये आले होते.