मुंबई : khabarbat News Network
सरकारी तेल कंपनी भारत पेट्रोलियमच्या पेट्रोल पंपावर गेल्या काही दिवसांपासून जोरदार ऑफर सुरू आहे. जर तुम्ही दुचाकी चालवत असाल तर तुम्हाला ७५ रुपयांचे पेट्रोल मोफत मिळेल. कंपनीची ही ऑफर २८ फेब्रुवारीपर्यंत चालेल.

भारत पेट्रोलियमच्या स्थापना दिवसाचे औचित्य साधून ही ऑफर सुरू करण्यात आली आहे. या ऑफरचा २८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत लाभ घेता येईल. या ऑफरचा फायदा घेण्यासाठी वय १८ वर्षांपेक्षा अधिक असावे. ज्या राज्यांमध्ये आणि केंद्र शासित प्रदेशात या ऑफर्सवर कायदेशीर बंदी आहे, तिथे या ऑफरचा लाभ घेता येणार नाही.
भारत पेट्रोलियमच्या या ऑफरसाठी ग्राहकाला मोबाईल क्रमांक पेट्रोल पंपावर नोंदवावा लागेल. या योजनेत भाग्यवानांना जवळपास १००० रुपयांचा कॅशबॅक पण मिळू शकतो. ही ऑफर माहिती झाल्याने अनेक पेट्रोल पंपावर वाहनधारक याविषयीची विचारणा करत आहेत.
या ऑफरचा फायदा घेण्यासाठी ग्राहकांना भारतीय पेट्रोल पंपावर पेट्रोल सोबतच एमएके-४टी इंजिन ऑईलचे कमीत कमी एक पॅक खरेदी करावे लागते. इंजिन ऑईल खरेदी करताच ग्राहकांना ७५ रुपयांचे पेट्रोल मोफत मिळेल. इंजिन ऑईल तुम्ही मोफतपणे पेट्रोल पंपावर बदलवू शकता. इतकेच नाही. तर इंजिन ऑईलच्या डब्ब्यावर एक क्युआर कोड असेल तो स्कॅन केल्यावर १,००० रुपयांपर्यंत कॅशबॅकचा फायदा सुद्धा होऊ शकतो. एका मोबाईल क्रमांकवर या ऑफरचा एकदाच लाभ घेता येईल. एकदा ऑफरचा फायदा घेतल्यावर पुन्हा दुस-या पेट्रोल पंपावर तुम्हाला ऑफरचा फायदा घेता येणार नाही.