कोल्हापूर : khabarbat News Network
Maratha Reservation Issue | मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उभारलेल्या आंदोलनानंतर महाराष्ट्र सरकारने मराठा समाजासाठी स्वतंत्र आरक्षणाला मंजुरी दिली. मात्र आम्हाला ओबीसीमधूनच आरक्षण पाहिजे या मागणीवर मनोज जरांगे पाटील अद्यापही ठाम आहेत. दुसरीकडे मराठा समाज देखील चांगलाच आक्रमक झाला आहे. कोल्हापुरात मराठा समाज संघटनांची बैठक पार पडली, या बैठकीत राज्यातील तब्बल ४२ मराठा संघटना सहभागी झाल्या होत्या.

हे पण वाचा… सरकारी नोकरदारांसाठी पन्नाशी ठरली धोक्याची; आता सक्तीची निवृत्ती!
मराठा समाजाच्या परिषदेसाठी १० मार्चपर्यंत मुख्यमंत्र्यांनी वेळ द्यावा, अन्यथा अधिवेशन काळातच आंदोलन छेडू, असा इशारा मराठा संघटनांच्या वतीने राज्य सरकारला देण्यात आला. लवकरच परभणीमध्ये मराठा समाजाची परिषद होणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात सरकारसोबत चर्चेला प्राधान्य दिले जाईल, मात्र दखल न घेतल्यास रस्त्यावरच्या लढाईचा मार्ग मोकळा असेल, असा इशारा यावेळी आंदोलक सुरेश पाटील यांनी दिला आहे.
दुसरीकडे मनोज जरांगे पाटील आणि आमचे आंदोलन एकच असेल, मात्र आरक्षणाशिवाय अन्य काही मागण्या आम्ही करणार आहोत, मागण्या सरकारने मान्य केल्याच पाहिजेत, अशी प्रतिक्रिया आंदोलक ज्योती मेटे यांनी दिली.
हे पण वाचा… बेरोजगार तरुणांना प्रत्येक महिन्याला मिळणार 5000 रुपये!
मराठा समाजाने पुन्हा एकदा सरकारला इशारा दिला आहे. मागण्या मान्य न झाल्यास अधिवेशन काळात आंदोलन करू असे म्हटले आहे. तसेच रस्त्यावर देखील उतरू असाही इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत पुन्हा एकदा राज्यातील वातावरण तापण्याची शक्यता आहे.