मुंबई : विशेष प्रतिनिधी
RBI Now in Tension | असुरक्षित कर्जे आणि स्पेक्युलेटिव्ह ट्रेडिंगमुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे टेन्शन वाढले आहे. भारताच्या वेगाने होत असलेल्या डिजिटल आर्थिक विस्तारामुळे संधी आणि जोखीम दोन्ही वाढत आहेत. या काळात वाढती असुरक्षित कर्जे आणि speculative trading मुळे नवी आव्हाने निर्माण होत आहेत. अनियंत्रित कर्ज आणि स्पेक्युलेटिव्ह ट्रेडिंग व्यक्ती किंवा संस्थांना असुरक्षित बनवू शकतात. अल्पकालीन नफ्याचा मोह दीर्घकालीन आर्थिक सुरक्षिततेला सहज ग्रहण लावू शकतो, असे RBI चे डेप्युटी गव्हर्नर एम. राजेश्वर राव म्हणाले.

हे पण वाचा… खूशखबर !! सेट टॉप बॉक्स वापरणा-यांची चांदी होणार, कशी ते पहा!
गव्हर्नर एम. राजेश्वर राव यांनी वित्तीय क्षेत्रातील संस्थांना निष्काळजीपणे आर्थिक व्यवहार न करण्याचा इशारा दिला. RBI ग्राहकांना शिक्षित करण्यासाठी इतर वित्तीय क्षेत्रातील नियामकांसह काम करीत आहे आणि वित्तीय साक्षरतेच्या अभावामुळे लोक बनावट कंपन्यांना बळी पडतात. मात्र, जेव्हा एखादा धक्का बसतो, तेव्हा गुंतवणूकदाराचा आर्थिक व्यवस्थेवरील विश्वास उडतो आणि म्हणूनच व्यवस्थेने आपल्या भल्यासाठी शिक्षणात गुंतवणूक करणे आवश्यक आहे, असे त्यांनी नमूद केले.
हे पण वाचा… Recruitment 2025 | बँक ऑफ बडोदामध्ये महाभरती
जागतिक वित्तीय बाजार आणि व्यापार धोरणाच्या आघाडीवर वाढती अनिश्चितता आणि प्रतिकूल हवामानाच्या घटनांमुळे महागाई आणि विकासाला धोका निर्माण झाल्याचेही गव्हर्नर एम. राजेश्वर राव यांनी स्पष्ट केले.