Bank of Baroda ने अपरेंटिस पदाच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. अर्ज करण्याची प्रक्रिया 19 मार्चपासून सुरु होईल. इच्छुक तरुण-तरुणी या पदांसाठी बँकेची अधिकृत वेबसाइट bankofbaroda.in वर जाऊन 11 मार्च 2025 पर्यंत अर्ज करु शकतात. बँकेने अपरेंटिसच्या एकूण 4 हजार पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. अपरेटिंसची ही पदे देशाच्या विभिन्न राज्यात भरली जाणार आहेत. निवड झालेल्या उमेदवाराला दर महिन्यात 15 ते 20 हजार रुपयादरम्यान स्टायपेड मिळेल.

बँक ऑफ बडोदात अपरेंटिस पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे कुठल्याही शाखेची मान्यताप्राप्त विद्यापीठातील ग्रॅज्युएशनची डिग्री असली पाहिजे. उमेदवाराला स्थानिक भाषेची माहिती असली पाहिजे. उमेदवाराचे वय 20 ते 28 दरम्यान असलं पाहिजे. आरक्षित वर्गाच्या उमेदवारांना वयामध्ये सूट देण्यात आलीय.
अर्जदाराची निवड सीबीटी परीक्षा, भाषा टेस्ट, मेडिकल टेस्ट आणि डॉक्यूमेंट्स वेरिफिकेशनमधून होईल. परीक्षेत सामान्य आणि आर्थिक जागरुकता, संगणक ज्ञान आणि सामान्य इंग्रजीशी संबंधित प्रश्न विचारले जातील.
जनरल आणि ओबीसी कॅटेगरीच्या अर्जदारांना 800 रुपये एप्लीकेशन फी भरावी लागेल. एससी आणि एसटी श्रेणीच्या उमेदवाराला 600 रुपये आणि दिव्यांग अर्जदारांसाठी 400 रुपये फी निश्चित करण्यात आली आहे. सर्व श्रेणीच्या अर्जदारांना जीएसटी शुल्क सुद्धा भरावं लागेल.
Process for Application…….
Bank of Baroda ची अधिकृत वेबसाइट bankofbaroda.in वर जा.
होम पेजवर दिलेल्या करिअर टॅबमध्ये क्लिक करा.
आता Current Opportunities टॅब वर क्लिक करा.
अपरेंटिस अप्लायसाठी लिंक वर क्लिक करा.
रजिस्ट्रेशन करा आणि फॉर्म भरा.
डॉक्यूमेंट्स अपलोड करा आणि फी जमा करुन सबमिट करा.