पाकिस्तानमधील बलुचिस्तान प्रांतामध्ये पुन्हा एकदा भीषण स्फोट झाला. कोळसा खाणीतील कामगारांना घेऊन जात असलेल्या वाहनाला लक्ष्य बनवून करण्यात आलेल्या या स्फोटामध्ये ११ जणांचा मृत्यू झाला. इतर ६ जण जखमी झाले आहेत.

हा स्फोट बलूचिस्तान प्रांतामधील हरनई येथे झाला. कोळसा खाणीमधील कामगारांना घेऊन जात असलेल्या एका पिकअप वाहनात स्फोटकांच्या माध्यमातून हा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये ११ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर सहा जण जखमी झाले. जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा स्फोट रिमोटने संचालित होणा-या यंत्राच्या माध्यमातून घडवण्यात आला.
दरम्यान, आतापर्यंत कुठल्याही संघटनेने या स्फोटाची जबाबदारी स्वीकारलेली नाही. ट्रकमध्ये १७ खाण कामगार होते. अशी माहिती या विभागाचे उपायुक्त हजरत वली आगा यांनी दिली.