khabarbat

Meta recently announced that it would lay off 5% of its underperforming employees, and is preparing to lay off 3,600 employees next week.

Advertisement

  • Advertise with khabarbat.com

Meta Layoffs | ‘मेटा’तून ३,६०० कर्मचा-यांना डच्चू; ‘मशिन लर्निंग’ला संधी

सॅनफ्रान्सिस्को : News Network
फेसबुक आणि इंस्टाग्रामची मूळ कंपनी Meta मध्ये पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात नोकर कपात होणार आहे. वृत्तानुसार, सीईओ मार्क झुकरबर्ग यांच्या नेतृत्वाखालील कंपनी पुढील आठवड्यात ३,६०० कर्मचा-यांना काढून टाकण्याची तयारी करत आहे. यामध्ये विविध देशातील कर्मचा-यांचा समावेश असणार आहे. मेटाने अलीकडेच कमी कामगिरी करणा-यांपैकी ५% टक्के कर्मचा-यांना काढून टाकणार असल्याची घोषणा केली होती. म्हणजे अपेक्षेप्रमाणे काम न करणा-यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात येणार आहे.

हे पण वाचा… ‘आप’च्या पराभवाची पाच कारणे….

Meta ने आपल्या कर्मचा-यांना पाठवलेल्या अंतर्गत मेमोमधून नोकर कपातीचे कारण समोर आलं आहे. कंपनी मशीन लर्निंग अभियंत्यांची भरती करण्याची प्रक्रिया वेगवान करणार असल्याचे त्यात स्पष्ट केलं आहे.

सोमवारीपासून अमेरिकेसह अनेक देशांमध्ये ही नोकरकपात करण्यात येणार आहे. दुसरीकडे जर्मनी, फ्रान्स, इटली आणि नेदरलँड्स सारख्या देशांमध्ये कोणतीही कारवाई करण्यात येणार नाही. कारण त्यांचे स्थानिक कामगार कायदे त्याची अंमलबजावणी करण्यास परवानगी देत ​​नाहीत. त्याचबरोबर युरोप, आशिया आणि आफ्रिकेतील अनेक देशांमध्ये ११ फेब्रुवारी ते १८ फेब्रुवारीदरम्यान कर्मचा-यांना नोटीस पाठवण्यात येणार आहेत.

अमेरिकेत रोजगाराच्या संधी कमी
Bloomberg च्या अहवालानुसार, अमेरिकेतील नोकरीच्या संधी डिसेंबरमध्ये अपेक्षेपेक्षा कमी होऊन तीन महिन्यांतील नीचांकी पातळीवर आल्या आहेत. ब्यूरो ऑफ लेबर स्टॅटिस्टिक्सने मंगळवारी जारी केलेल्या खडछळर अहवालानुसार, उपलब्ध नोक-यांची संख्या नोव्हेंबरमधील ८.१६ दशलक्ष वरून डिसेंबरमध्ये ७.६० दशलक्ष इतकी घसरली आहे.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

Translate »