नवी दिल्ली : khabarbat News Network
Toll tax | केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी २०२५-२६ सालासाठीचा अर्थसंकल्प संसदेत सादर केला. या अर्थसंकल्पात १२ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावरील कर माफ करण्यात आला आहे. मोदी सरकारने मध्यमवर्गाला दिलेला हा मोठा दिलासा आहे. त्यापाठोपाठ आता टोलमध्येही सरकार गुड न्यूज देणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन (Nitin Gadkari) गडकरी यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये याबाबतचे संकेत दिले आहेत.

हे पण वाचा….. Chat GPT, DeepSeek विषयी केंद्र सरकारचा अलर्ट जारी
सरकारच्या योजनेतून लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे, असे गडकरी (Gadkari) यांनी सांगितले. नव्या तंत्रज्ञानाचा वापर करुन प्रदूषण आणि वाहतूकीची (traffic) समस्या कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी अनेक योजना सुरु केल्या जाणार आहेत. त्यासाठी त्यांच्या मंत्रालयाचा अभ्यास पूर्ण झाला आहे, असे गडकरी यांनी स्पष्ट केले.
टोल समाप्त होणार? : नव्या योजनेमुळे टोल समाप्त होणार का? या प्रश्नावर गडकरी यांनी सस्पेंस कायम ठेवला. या योजनेची घोषणा लवकरच केली जाईल असे त्यांनी सांगितले. सरकार उपग्रहावर आधारित टोल (Toll) पद्धतीवर काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. याबाबतही निर्णय होणार आहे. पण, हा निर्णय या योजनेपासून वेगळा आहे. आगामी काळात टोल देणा-यांची नाराजी दूर केली जाईल, असे गडकरी यावेळी म्हणाले.
महत्त्वाचे मुद्दे
– पाच वर्षांच्या आत दिल्लीमध्ये एकही डिझेल बस दिसणार नाही. सर्व इलेक्ट्रिक बस धावतील.
– माझ्याकडे १०० टक्के इथेनॉलवर चालणारे वाहन आहे.
– टाटा, सुझुकी, महिंदा हे देखील इथेनॉलवर चालणारी वाहने आणणार आहेत.
– डिझेल, पेट्रोल कार, ट्रक-बसची किंमत एक होईल.
– आगामी काळात देशात १ लाख इलेक्ट्रिक बस तयार होतील.