मुंबई : प्रतिनिधी
Gold made big leap| यावर्षीच्या अर्थसंकल्पात सोने-चांदीवरील करात कोणतीही कपात झाली नाही. कर कपातीमुळे गेल्यावर्षी भाव कमी झाले होते. यंदा कराबाबत कोणतीच घोषणा न झाल्याने मौल्यवान धातु स्वस्त होण्याची शक्यता मावळली होती. गेल्या दोन दिवसात सोन्याने मोठी मजल मारली. दुसरीकडे चांदीने नरमाईनंतर पु्न्हा झेप घेतली. काही शहरात तर सोने ८००-१००० रुपयांनी वधारले. तर दुसरीकडे चांदी किलोमागे हजारांनी वधारली.

गेल्या आठवड्याप्रमाणेच सोन्याने या आठवड्यात कमाल दाखवली. आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोने ४४० रुपयांनी स्वस्त झाले होते. तर मंगळवारी ११५ रुपयांनी आणि बुधवारी १०४० रुपयांनी सोने वधारले. गुडरिटर्न्सनुसार, आता २२ कॅरेट सोने ७९,२०० रुपये प्रति १० ग्रॅम तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ८६,३९० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. (latest marathi news)
आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार २४ कॅरेट सोने ८४,६५७, २३ कॅरेट ८४,३१८, २२ कॅरेट सोने ७७,५४६ रुपयांवर आहे. १८ कॅरेट आता ६३,४९३ रुपये, १४ कॅरेट सोने ४९,५२४ रुपये प्रति १० ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव ९५,४२५ रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. मात्र सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते. (Silver and Gold rates)
चांदी लाखाच्या उंबरठ्यावर
चांदीत जानेवारी महिन्यात डाबडुबलीचा खेळ सुरू होता. काही दिवस तर भाव फ्रीज झाले होते. या आठवड्याच्या पहिल्या दिवशी भाव स्थिर होते. ४ फेब्रुवारी रोजी चांदी १ हजार रुपयांनी उतरली. बुधवारी (दि. ५) चांदी हजारांनी वधारली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव ९९,५०० रुपये इतका आहे.