नवी दिल्ली : khabarbat News Network
Alert on AI | सध्या कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा मुक्त वापर होत आहे. शाळा-महाविद्यालयातील तरुणांपासून ते सरकारी कर्मचा-यांपर्यंत त्याचा वापर वाढला आहे. अनेक प्रकल्पासाठी AI अॅपचा वापर वाढला आहे.Chat GPT, DEEP Seek या प्लॅटफॉर्मचा वापर वाढला आहे. मात्र मोदी सरकारने एआयचा वापर करणा-या कर्मचा-यांसाठी अलर्ट जाहीर केला आहे. वित्त मंत्रालयाने सरकारी कार्यालयातील लॅपटॉप, पीसी अथवा शासकीय इलेक्ट्रॉनिक गॅझेटमध्ये कोणत्याही एआय अॅपचा वापर न करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे गोपनिय माहिती आणि डाटा चोरीचा धोका असल्याचे मोदी सरकारने स्पष्ट केले आहे. (latest news on AI)

सध्या भारतात Chat GPT आणि DeepSeek, Google Gemini या एआय अॅप्सचा वापर होतो. हे AI अॅप पहिल्यांदा वापर करताना डेटा परवानगी घेतात. त्यांना सर्व अॅक्सेस मिळाल्यावर संबंधित लॅपटॉप, पीसी, मोबाईलची हेरगिरी होण्याची भीती असते. त्यामुळे मोदी सरकारने तातडीने हा निर्णय घेतला आहे. अनेक सरकारी कर्मचारी या एआय अॅपच्या मदतीने सादरीकरण, प्रेझेंटेशन करतात. त्यासाठी फार कष्ट पडत नाहीत. केवळ एक टेक्स्ट प्रोम्ट करून हे काम करता येते. (India ban on AI)
डिपसिक ठरले लोकप्रिय
चीनचे स्मार्टअॅप डिपसिक सध्या लोकप्रिय ठरले आहे. या स्टार्टअपने किफायतशीर दरात सेवा उपलब्ध करुन दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. चीनचे हे स्टार्टअप अॅप जवळपास २० महिने अगोदर सुरू झाले होते. २० जानेवारी २०२५ रोजी DeepSeek R1 चॅटबोटच्या वापरात अचानक तेजी आली. त्याने अनेक एआय कंपन्यांची झोप उडविली आहे. अमेरिकेत DeepSeek विरोधात लवकरच मोठी कारवाई पाहायला मिळाल्यास वावगे ठरू नये. भारताचे पण लवकरच स्वत:चे एआय अॅप येणार आहे.