इंदोर : News Network
Beggers in Indore | मध्यप्रदेशातील इंदोर जिल्ह्यात भीक देणे आणि मागणे यावर कठोर कारवाई केली जात आहे. जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात भीक मागण्यावर बंदी घातली आहे. भीक देणे आणि घेणे बेकायदेशीर असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. इंदोरला देशातील पहिले ‘भीक मुक्त शहर’ करण्याचा सरकारचा प्लान आहे. त्यामुळे प्रशासाने हे कठोर पाऊल उचलले आहे.

सोमवारी लसूडि़या (Lasudia) पोलिस ठाण्याच्या परिसरात एका मंदिराबाहेर एका व्यक्तीने भिका-याला १० रुपये दिले. त्यानंतर प्रशासनाच्या भिक्षावृत्ती उन्मूलन पथकाने तक्रार दाखल केली आणि वाहनचालकावर थेट FIR नोंदविण्यात आला. भिका-याला भीक दिली म्हणून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भिका-याला भीक दिल्यानंतर कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागल्याची इंदोर (Indore) शहरातील गेल्या १५ दिवसातील ही दुसरी घटना आहे. (begging in Indore, Bhopal)
मागील सहा महिन्यात शहरात ६०० पेक्षा जास्त भिका-यांना पुनर्वसनासाठी आश्रयगृहात पाठवण्यात आले आहे. त्यापैकी जवळपास १०० मुलांना बाल देखभाल संस्थांमध्ये पाठवले गेले आहे. या भिका-यांपैकी अनेक जण ट्रॅफिक सिग्नलवर इतर वस्तू विकत भीक मागताना आढळले होते, असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले. (Marathi Latest News)