khabarbat

There have been discussions that the path for Eknath Khadse to join the BJP has been cleared.

Advertisement

  • Advertise with khabarbat.com

देवेंद्र फडणवीसांची रात्री भेट; खडसेंचा परतीचा मार्ग खुला?

मुंबई : khabarbat News Network
एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अचानक भेट घेतल्याने आता एकनाथ खडसे यांचा भाजपात प्रवेश करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, अशा चर्चांना उधाण आले आहे. त्या पार्श्वभूमीवर एकनाथ खडसे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत याबाबत स्पष्टीकरण दिले.

एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांची घेतलेली भेट आणि भाजपामधील घरवापसीच्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना म्हणाले की, मी माझ्या मतदारसंघातील विकासकामांसंदर्भात मी मुख्यमंत्री (CM Fadanvis) देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या भेटीमध्ये भाजपामध्ये जाणे किंवा प्रवेश करणे याबाबतची कोणतीही चर्चा किंवा राजकीय चर्चा या बैठकीमध्ये झालेली नाही. असे एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी स्पष्ट केले. तसेच देवेंद्र फडणवीस यांच्याशी ही भेट झाली तेव्हा आपल्यासोबत तिथे कुणीही उपस्थित नव्हते, मी एकटाच भेटायला गेलो होतो, असेही एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केले आहे. (khadse meets fadanvis)

दरम्यान, एकनाथ खडसे आणि देवेंद्र फडणवीस (Dev_fadanvis) यांच्यात मंगळवारी रात्री अचानक भेट झाल्याने चर्चांना उधाण आले होते. २०१४ साली भाजपा राज्यात सत्तेवर आला तेव्हा देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री बनवण्यात आले होते. त्यावेळी ज्येष्ठ नेते असलेले एकनाथ खडसे नाराज झाले होते. त्यामुळे त्यांच्यात आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये संघर्षाला तोंड फुटले होते. मात्र पक्षात पडलेली फूट आणि विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील बदललेली राजकीय समीकरणे विचारात घेऊन एकनाथ खडसे हे घरवापसी करतील असे दावे केले जात आहेत. (latest marathi news)

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

Translate »